Tuesday, November 11, 2008

अल्वा रूसल्या....काँग्रेस हसली !

अल्वा रूसल्या....काँग्रेस हसली !

काँग्रेसच्या जुन्याजाणत्या राष्ट्रीय सरचिटणीस मार्गारेट अल्वा या भलत्याच रूसल्या आहेत. राजीनाम्याचं अस्त्र उपसण्याइतक्या त्या चिडल्या आहेत. त्यांच्या या रागातून काय-काय जन्माला येते हे अल्वांना उजव्या हाताशी बसविणार्‍या पक्षश्रेष्ठींनाच ठाऊक ! मात्र वर्षानुवर्षे निवडणुकांत काँग्रेसच्या तिकीटवाटपाचं राजकारण करणार्‍या अल्वांना त्यातील पैशाचा खेळ समजण्यासाठी आताच साक्षात्कार कसा झाला हे एक गूढच आहे. काँग्रेसध्ये पैसे घेऊन तिकीटे वाटण्यात येतात असा आरोप अल्वाबाईंनी गेल्याच आठवडात केला आणि खळबळ उडाली. त्यांचा हा 'भावनिक उद्रेक' होता असे काँग्रेसने जाहीर केले. मात्र हा उद्रेक कोणत्या कारणातून आला हे मात्र पक्षाला नेमकेपणाने ठाऊक असणार ! ते काहीही असो, अल्वा यांच्या रागाचे तात्कालिक कारण मात्र कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मुलाचे कापलेले तिकीट हे आहे. कर्नाटकात काँग्रेसचे पानिपत झाले आणि धर्मांधांची फौज सत्ता सिंहासनावर जाऊन बसली....शांतताप्रिय ख्रिश्चनांवर प्राणघातक हल्ल्यांचे सत्रही नंतर सुरू झाले. पण विधानसभा निवडणुकीत आपल्या मुलाचे तिकीट कापण्यात आल्याचे प्रकरण अल्वाबाईंनी फारच मनाला लावून घेतले. आता त्या निवडणुकीत तिकीट मिळाले जरी असते तरी हे अल्वा चिरंजीव जिंकले असते काय याबाबत बी. के. हरिप्रसादांपासून जाफर शरीफ यांच्यापर्यंत अनेकांनी तेव्हाच साशंकता व्यक्त केली होती. मात्र, अल्वांचा खरा राग तीन जणांवर आहे. १) दिग्विजयसिंह, २) वायलर रवी व ३) पृथ्वीराज चव्हाण. त्यातही डिग्गी राजांवर त्यांचा फारच राग आहे. आणि अल्वाबाईंचे ज्यांच्याशी पटत नाही, त्यांचा त्या कशा रागराग करतात हे दिग्विजयसिंहांनी आपले 'पंढरी वारी दोस्त' (!) विलासरावांना विचारून घ्यावे. दिग्विजयसिंह यांनीच आपल्या मुलाचे तिकीट कापले असे अल्वाबाईंचे म्हणणे. आता काँग्रेसध्ये वर्षानुवर्षे तिकीटे कशी वाटतात हे अल्वाबाईंना ठाऊक नाही हे कसे होईल? महाराष्ट्रासह अनेक राज्यांत त्यांनी तेच तर राजकारण केले होते. ते काहीही असो या 'मार्गारेट'च्या राजीनाम्याचे हे प्रकरण काँग्रेसनेही थंडा करके खाओ, या धोरणानेच घेतले होते. त्यांच्याबाबत काहीच टोकाची प्रतिक्रिया व्यक्त न करता काँग्रसेने सरळ अँटनींच्या शिस्तपालन समितीच्या कोर्टात तो चेंडू टाकून दिला. अँटनींनी अंकलनी मॅगी आंटींशी चर्चाही केली. सूत्रांच्या महितीनुसार अँटनींनी अल्वांना 'बाई, जरा दमानं घ्या,' असंही सजावलं म्हणे! पण या अँटनी फवार्‍याने अल्वांचा भडका काही की झाला नाही. त्यांनी सरळ राजीनाम्याचे अस्त्र उपसले. शेवटी आई ती आई असली तरी ज्याप्राणे अल्वा या एक माता आहेत, तशा सोनिया याही एक आईच आहेत की ! तिकीटवाटपाची सूत्रे सांभाळणार्‍या या मातेच्या राहूल नामक पुत्रानेच अल्वांना धुडकावले. हे पाहता सोनियांनी अल्वांकडे का पाठ फिरविली हे अल्वामंधली आई नेमकेपणाने समजली असणार. आता त्यांचे हे अस्त्र पक्षश्रेष्ठींवर कितपत प्रभाव टाकू शकेल याची शंकाच आहे.....असो अल्वांना हा साक्षात्कार आताच कसा झाला याची अनेक कारणं आहेत. त्यांना महाराष्ट्राची जबाबदारी नको आहे असे सांगतात. त्यांच्या अन्य अनेक मागण्याही पडून आहेत. त्यांना काही राज्यांची जबाबदारी हवी आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपात त्यांना महत्वाची भूमिका हवी आहे. मत्र दहा जनपथवरून काहीच हालचाल दिसत नसल्याने अल्वा वैतागल्या आहेत. त्यांच्या रागाला निमित्त मिळाले ते तिकीटवाटपाचे. मात्र त्यांच्या या भूमिकेने काँग्रेसधील अनेकजणांना मनोमन आनंदच झाला आहे. योगेंद्र मकवाना हे खुलेपणाने पुढे आले. पण इतरही या रांगेत बसून 'अल्वाजी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है' असं म्हणत असणार. पण एक गोष्ट लक्षणीय. महाराष्ट्रात नारायण राणेंना दिल्ली-वार्‍यांसाठी हवा भरताना किंवा नागालँडधील बंडोबांना सातत्याने बळ देणार्‍या अल्वांना यानिमित्ताने पक्षातले खरे दुःख कळाले असेल. राणेंच्या फुटीर समर्थकांना पोटनिवडणुकांत तिकीटे देताना बाई, कोठे होता तुझा धर्म? असे त्यांना कोणी विचारू नये म्हणजे मिळविले!
----------------------------

2 comments:

shrikrishna (Nashikwala) said...

shrikrishna....

mangesh, farch chan article aahe, vachun aandad vatla, barach divsani kahi tari vagle vachiyala milale...pudehi asech changle vachayala mile ashi apakshi karto bakki tik

प्रमोद said...

मंगेशा , अरे नियमित लिहीत जा रे मित्रा. नगरची शिकवणी विसरलास का ......राजे.